Skip to main content

Posts

Featured

स्वतः च पर्याय होण्याची गरज..........!

आंदोलन, उपोषण या मार्गांनी आजच्या घडीला कोणताही प्रश्न सुटण्याची शक्यता नाही, कारण आजची परिस्थिती पाहता बळी तो कानपिळी या न्यायाने ज्याच्याकडे संख्याबळ तोच राजा हेच  समीकरण  कायमस्वरूपी चलनात आहे अन येत्या काही वर्षांमध्ये देखील हेच मापदंड कमी अधिक प्रमाणात लागू होतील. आंदोलन किंवा उपोषणाला दाद देऊन प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करणं हे गाढवाकडून गीता वदवन्याइतपत हास्यास्पद आहे याची जाणिव आज सामान्य नागरीकांनी ठेवायला हवी, अर्थात यात वाईट असं काही नाही बदलत्या काळाबरोबर समस्या निराकरनाचे मार्गही बदलत असतात अन ते बदलते मार्ग अवलंबण्यातही गैर काही नाही. प्राध्यापक भरती साठी चालू असलेलं आंदोलन अन उपोषण याचा देखील याच अनुषंगाने विचार करावयास हवा, ज्या त्वेषाने एकेकाळी मोदींची पालखी वाहिली जात होती त्याच त्वेषाने किंबहुना थोडाबहुत अधिक जोर लावून मोदींच्या नावाखाली सत्तारूढ झालेल्या तथाकथित मंत्री महोदयांना राजधर्माचा आरसा दाखवायला हवा अन एका सशक्त राजकीय पर्यायाकरिता प्रयत्न करावयास हवा. २०१९ ची निवडणूक जवळ येते आहे त्यामुळे आता आश्वासनांचा प्रचंड पाऊस पडणार यात काहीच शंका नाही प...

Latest posts

स्वगत.....जगण्याचा प्रश्न ...!

मोरपंख