मोरपंख

नमस्कार ..... हा माझा पहिलाच ब्लाॅग होप सो तुम्हांला आवडेल .... 

           मुळात नावापासून सुरवात करूया .... मोरपंख .... नव्वद च्या दशकातील माझ्यासारख्या अनेक जनांच्या ओळखीची वस्तू .... पुस्तकाच्या पानांमध्ये अनेक वर्षे निपचित पडुन असलेलं मोरपंख ...नक्कीच साऱ्यांना आठवत असेल ...अर्थात कधी कधी या मोरपंखाची जागा जीर्ण पिंपळ पान देखील घ्यायचं ....पण तरीही मोरपंख अधिक ओळखीचं ... अधिक आपुलकीचं अन....... म्हणुनच त्या जुन्या दिवसांच्या आठवणींचं प्रतिक म्हणुन सांगता येण्यासारखं सगळ्यात योग्य नाव ..... हि अशीच एक फार जुनी गोष्ट आपल्याशी शेर करतोय.... थोड्या फार फरकाने ती प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेली असते .... कोणी व्यक्त केलेली असते किंवा माझ्यासारख्या बऱ्याच जणांची  ती  व्यक्त करणं राहून गेलेली  असते  .. काय ती गोष्ट ?...ती गोष्ट म्हणजे ' प्रेम ' अन बऱ्याचदा ' एकतर्फी प्रेम '... मग तिला सांगण्याच्या नुसत्या योजनांवर योजना आखल्या जातात अन सरतेशेवटी मात्र अवसान घात होतो ... अन सांगायचं..... द्यायचं...... सारं काही आपलं आपल्याकडेच राहतं ... आठवण म्हणुन ... अगदी त्या मोरपंखासारखं.... उपेक्षित...  परंतु आज इतक्या वर्षांनतर तीतकच मजेशीर ... असचं एक प्रेम पत्र कधी न दिलेलं अन आठवणीत राहिलेलं आपल्यासाठी सादर करतोय , हेतू इतकाच की त्या निमित्ताने आपले काही जुने दिवस नव्याने डोळ्यांसमोर उभे राहतील ... थोडसं बालपण ..अन नवं नवं तरुणपण  पुन्हा अनुभवता येईल ..........

         " अशी सारखी तु आठवतेस ..... तुझ्यात कधी ‘मी’ शोधण्यासाठी अनंत शब्द ओठांवर येतायेताच थबकतात.....  सांगायचं काहीतरी अन काहीतरीच सांगुन जातात. अशी तु ... काळजाच्या कुण्या एका अदृष्य कोपऱ्यात खोल रुतून बसलेल्या मौल्यवान हिऱ्याप्रमाणे..  तुझं अस्तित्व .... तु नसल्यावर निरस वाटणारं जगाचही अस्तित्व ..... या दोहोंमध्ये माझा पुरता बोझवारा उडालाय .... मी काय करतोय ..... कशासाठी करतोय काहीच उमगत नाही .... मी जगतोय तर नक्की का ? .... अन कशासाठी ... ध्येय .... दुरदुरपर्यंत अदृश्यच भासत आहेत केवळ तुझ्यामुळे. मी विचारेन तुला .... मी सांगेन तुला ... सारं मनातलं बोलेन तुला.. पण तु ऐकशील.... बरं ऐकलं तरी तुला खरं वाटेल .... वाटलं तरी तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा हळुवार झरा स्रवेल .... काहीच कळत नाही ... असा बघ मी इतका मोघम वाहतोय की, दाही दिशा ... जग .. आकाश कशाकशाचाही बंध मनास अंतरास राहत नाहीये .... जी गोष्ट करेन त्यात तु दिसतेस .... तुझी आठवण सलते .... याने तुला वाईट तर नाही ना वाटणार या विचाराने मन हरक्षनीच स्वतःस समजावतेय .... एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतेय... याचा अर्थ काय ? .... कदाचित मला हा गवसलायही पण तुला गवसेल की नाही कुणास ठाऊक ....? वाट चुकल्या पाखरालाही ..सरत्या दिवसात संधी प्रकाशात आपली अस्तित्व छटा गवसते .... अस्वस्थ तेही असते क्षणभर पण ... केशरी .. सोनसळी ... किरणांत त्याला त्याची दिशा गवसते .. अन सुटलेले तुटलेले काळजाचे बंध साऱ्या नवीन अनोळखी जगातही त्याला आपल्या माणसांकडे आपल्या घरट्याकडे खेचुन आणतात .... मी म्हणत नाही की तुला पाहताच वेडा झालो ... असं क्षणात फसफसनारं अन दुसऱ्याच क्षणी हवेत विरणारं बेगडी प्रेम नाहीच .... प्रेम ... हळुहळू कळतं मनात उतरतं काळजास भिडतं आत्म्यास मिळतं अन मगच ..... तु दिसण्याची ओढ लागते ... तुला पाहण्यासाठी जीव वेडा होतो .... शब्द दोन बोलण्यासाठी .... आकंठ वाट पाहतो. ..... तु बोललीस की दिवस माझा होतो .. अन रात्र मात्र तुझी होते .... मग सताड उघड्या डोळ्यांत तुझं रूप रात्रभर तरळतं .... ती वाक्य ... तुझे बोल पुन्हा पुन्हा कानावर येतात त्या आवर्तनात झोप तर येत नाहीच पण जागं म्हणावं तर जगाचही भान राहत नाही ..... काय सांगु तुला ..... कदाचित तुही अनुभवलं असशील कुणा एकाचं प्रेम .... कुणास ठाऊक ... तु जाणलं असशील... स्वीकारलही असशील... कुणा एकाचं प्रेम ... पण काळजात घडलेल्या या तुझ्या आठवणींच्या .... तुझ्या अस्तित्वाच्या जखमा काही काही म्हणुन सुचू देत नाहीत .... किती समजावुन देखील वेडं काळीज काहीच मानत नाही ..... म्हणुन तुला सांगण्याचा खटाटोप .... पण भीती वाटतेय कदाचित पुन्हा तु बोलणार नाहीस ..... “ मी असा विचारचं नव्हता केला ” असं म्हणुन अव्हेरशील .... पण मला तुझ्या अव्हेरण्याची भीती नाही ... तुझ्या कटु बोलण्याची देखील वाटत नाही ..... मला फक्त भीती .... तु न बोलण्याचीच अन तु न पाहण्याचीच .... तरीही .... अंतराच्या तळाशी .... दूर नभाच्या उराशी .... कधीतरी ... तु न बोलण्याची .... न दिसण्याची सल घेवून जगेन मी .... डोळ्यांतील आसवं .... काळजाच्या वेड्या पसाऱ्यात ... समेटून देखील घेईन मी .... क्षण दोन तु बोललेले ... क्षण दोन तु दिसलेले ... असेच हृदयाच्या आरशात जपेन मी ... अन तु हा म्हंटलीस किंवा नाही तुझ्या आठवणींतच जगेन अन ..... कदाचित जगाच्या वाळवंटात तुझ्या साथीशिवाय ... तुझ्या येण्याशिवाय .... झुरत ... वाट तुझी पहात ... मरेन .... मालवेन .... अन न संपणाऱ्या अथांग ..... विरह सागरात ... मरण येत नाही म्हनुन अनंतापर्यंत थिजेन ......... "  

तुझाच,

XXXXX



काय कसा वाटला टिपिकल मजनू , पण काय करायचं हा नकळत्या वयातला कळतेपणा आहे...





Comments

  1. Wow..just beyond expectations...
    You expressed your feeling through the letter.
    But I like your language and appreciable grammar..
    Iooking forward for such fabulous writing
    Keep it up..

    ReplyDelete

Post a Comment